मुंबईः मरिन ड्राईव्ह येथे सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ बनवलेलं मेटल आर्ट पीस काढून टाकण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. आरपीजी आर्ट फाउंडेशनला नोटीस बजावून 24 तासांत ही वास्तू हटवण्यास सांगितलं आहे.

 

 

आर्ट फाऊंडेशनने 24 तासांत ही वास्तू न हटवल्यास महापालिका स्वतः यावर कारवाई करेल, असं महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं. यापूर्वीही आरपीजी फाऊंडेशनला मुंबई हेरिटेज संवर्धन समितीने नोटीस बजावली होती. मात्र त्याचं पालन न झाल्यामुळं पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे.

 

 

मरीन ड्राईव्ह ही हेरिटेज दर्जा असलेली जागा आहे. मरिन ड्राईव्हला युनोस्कोने देखील हेरिटेज जागेचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणतीही वास्तू उभारली जाऊ शकत नाही, असं हेरिटेज समितीचं म्हणणं आहे.