नवी मुंबई : दिघावासीयांना थोडो दिलासा मिळाला आहे. कारण अनधिकृत इमारतीवर पावसाळ्यात कारवाई करण्यास असमर्थ असल्याचं एमआयडीसीनं हायकोर्टात म्हटलं आहे. त्यामुळे किमान पावसाळ्यापुरतं दिघावासीयांना बेघर व्हावं लागणार नाही.

 

एमआयडीसीची भूमिका काय आहे?

 

पावसाळ्यात जून ते सप्टेंबर दरम्यान कुठल्याही बेकायदेशीर बांधाकामांवर हातोडा चालवू नये, जेणेकरुन त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होईल, असा राज्य सरकारचा अध्यादेश आगोदरपासूनच अस्तित्त्वात आहे. त्यामुळे सध्या दिघ्यातील बेकायदेशीर बांधाकाम जमिनदोस्त करण्यात अडचण आहे, अशी भुमिका एमआयडीसीनं हायकोर्टात मांडली.

 

यासंदर्भात आज रितसर अर्ज दाखल करावं लागणार आहे. न्यायाधीश अभय ओक आणि न्यायाधीश सय्यद यांच्या खडंपीठाने हा आदेश दिला असून, यावर आज हायकोर्टात काय आदेश दिला जातो, यावर दिघावासियांचं नजीकच भविष्य अवलंबून आहे.