मुंबई : मुंबईत भाजपची एक जागा वाढली आहे. ईश्वर चिठ्ठीमुळे भाजपचे अतुल शाह विजयी झाले आहेत. यामुळे मुंबईत भाजपला एकूण 82 जागांवर विजय मिळाला आहे. आता शिवसेनेला भाजपपेक्षा केवळ दोनच जागा जास्त मिळाल्या आहेत.
मुंबईतील वॉर्ड क्रमांक 220 मध्ये शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर आणि भाजपचे अतुल शाह यांना समान मतं मिळाली होती. त्यानंतर फेरमतमोजणी घेण्यात आली. सुरुवातीपासून आघाडीवर असणाऱ्या शिवसेनेला शेवटच्या काही राऊंडमध्ये फटका बसला आणि निकाल पलटला.
सुरेंद्र बागलकर आणि अतुल शाह यांच्यात टाय झाला तर दोन पर्याय समोर होते. त्यापैकी पहिला पर्याय लॉटरीचा आणि दुसरा उमेदवार कोर्टात जाऊ शकतात. अखेर ईश्वर चिठ्ठीचा पर्याय निवडण्यात आला. ही ईश्वर चिठ्ठी भाजपच्या अतुल शाह यांच्या बाजूने आली. त्यामुळे शाह यांना विजयी घोषित करण्यात आलं.
वॉर्ड क्रमांक २२० मध्ये झालेली लढत ही अटीतटीची आणि 'तिरंगी' होती. शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर आणि भाजपचे अतुल शहा यांच्या टाय व्यतिरिक्त काँग्रेसच्या नरेंद्र शेठ यांनीही कडवी लढत दिली.
राऊंड १
शिवसेना - ८१५
भाजप- ४७९
काँग्रेस -१८१
राउंड २
शिवसेना ७८४
भाजप ५३९
काँग्रेस १५०
राऊंड ३
शिवसेना ८९५
भाजप ६३०
काँग्रेस १७८
राऊंड ४
शिवसेना ८६२
भाजप ६१२
काँग्रेस २३७
राऊंड ५
शिवसेना ४९९
भाजप ३०५
काँग्रेस ४२४
राऊंड ६-
शिवसेना १६५
भाजप ५७
काँग्रेस ७००
राऊंड ७
शिवसेना १७८
भाजप ११०
काँग्रेस ६०७
राऊंड ८
सेना १८४
भाजप ८४
काँग्रेस ६४०
राऊंड ९
शिवसेना २०२
भाजप ७८
काँग्रेस ८०९
राऊंड १०
शिवसेना ६६०
भाजप ६७१
काँग्रेस ४२४
राऊंड ११
शिवसेना ३१८
भाजप ८५०
काँग्रेस ४३१
राऊंड १२
शिवसेना २९१
भाजप ८९८
काँग्रेस ३८०
राऊंड १३
शिवसेना ९३
भाजप ६३३
काँग्रेस १९७
एकूण-
५९४६- शिवसेना, सुरेंद्र बागलकर
५९४६- भाजप, अतुल शहा
५३५८- काँग्रेस नरेश शेठ