मुंबई: यंदाच्या दिवाळीत फटाक्यांमुळे मुंबईत आगीच्या (Mumbai Fire) 79 घटना घडल्याचं समोर आलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. मुंबई अग्निशमन विभागाने दिवाळी दरम्यान फटाक्यांमुळे झालेल्या 79 आगीच्या घटनांना प्रतिसाद दिला आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त होता, असे अग्निशमन अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर निर्बंध घातले असतानाही हा प्रकार घडला.


वाढत्या प्रदूषण आणि आगीच्या घटनांमुळे, महाराष्ट्र सरकार आणि नागरी संस्थेने लोकांना प्रदूषण आणि अग्निमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आणि अग्निसुरक्षा आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. अधिकृत आकडेवारीनुसार, विभागाला 2022 मध्ये 65 आगीशी संबंधित कॉल आले होते आणि गेल्या वर्षी फटाक्यांमुळे 37 कॉल नोंद केले गेले.


विलेपार्लेत 11 मजली इमारतीला आग


दिवाळीच्या सुरुवातीलाच विलेपार्ले येथील एका 11 मजली इमारतीला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, उच्चभ्रू इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. या घटनेत एका 96 वर्षीय महिलेला आपला जीव देखील गमवावा लागला.


आणखी एका भीषण आघीच्या घटनेची नोंद बुधवारी सकाळी भायखळा येथील इमारतीत केली गेली. घटनेच्या व्हिज्युअलमध्ये इमारतीतून दाट धूर निघताना दिसत आहे, ज्यामुळे आकाशात जणू काळे ढग जमा झाल्याचे भासत होते. व्हिडीओमध्ये काही लोक तर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या येण्याची वाट पाहताना दिसली.


लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 27 घटना


लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात 27 आगीच्या घटनांची नोंद करण्यात आली. अशाच एका घटनेत जोगेश्वरी पश्चिम येथील इमारतीच्या 13व्या मजल्यावरील बाल्कनीत रॉकेट घुसल्याने आग लागली. मुंबई अग्निशमन दलाने (MFB) 10 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत सरासरी 13 आगीच्या घटनांना प्रतिसाद दिला.


दरवर्षी असे दिसून आले आहे की अशा परिस्थितीत रहिवासी घाबरतात ज्यामुळे अग्निशमन दलासाठी स्थलांतर प्रक्रिया अधिक कठीण होते. आगीशी लढण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण अत्यंत महत्वाचे घटक आहेत. या वर्षी बीएमसी आणि मुंबई अग्निशमन दलाने चाळ आणि झोपडपट्टी भागात जनजागृती मोहीम हाती घेतली होती. मुंबई अग्निशमन दलाने सुमारे १६९ व्याख्याने आयोजित केली होती. दिवाळीच्या काळात शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे, वरिष्ठ अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.


त्याच वेळी, गोरेगाव आगीच्या घटनेची भीषण परिस्थिती लक्षात ठेवता, प्रशासन लोकांच्या सुरक्षिततेसाठी सुधारित लिफ्ट मार्गदर्शक तत्त्वांवर काम करत आहे, ज्यामध्ये उंच इमारतींसाठी फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट नियमांचा देखील समावेश आहे.


ही बातमी वाचा: