मुंबई : मुंबई महापालिकेच्या 17 प्रभाग समित्यांपैकी 8 प्रभाग समित्यांची आज निवडणूक पार पडली. ए, बी आणि ई, सी आणि डी, एफ-दक्षिण आणि एफ-उत्तर, जी-दक्षिण, पी दक्षिण, पी-उत्तर, आर-दक्षिण, आर-उत्तर आणि आर-मध्य प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक झाली.


यात  ए, बी आणि ई प्रभागात आज निवडणूक झाली. इतर प्रभाग समित्यांच्या निवडणुका या बिनवरोध पार पडल्या.

भाजप पुरस्कृत आभासेच्या गीता गवळी ए,बी, ई प्रभागात सेनेच्या पाठिंबाने विजयी झाल्या. तर बाकी प्रभाग समितीवर सेना-भाजपच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड झाली आहे.

कुठल्या प्रभाग समितीत कोण विजयी?

  • ए , बी आणि इ - गीता गवळी  ( अभासे )

  • सी आणि डी - ज्योत्स्ना मेहता ( भाजप )

  • एफ दक्षिण आणि एफ उत्तर - प्रल्हाद ठोंबरे ( शिवसेना )

  • जी दक्षिण - आशिष चेंबुरकर ( शिवसेना )

  • पी दक्षिण - राजुल देसाई ( भाजप )

  • पी उत्तर - दक्षा पटेल  ( भाजप )

  • आर दक्षिण - कमलेश यादव  ( भाजप )

  • आर उत्तर आणि आर मध्य - शीतल म्हात्रे ( शिवसेना )


मुंबई महापालिकेच्या आठ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप कडून उमेदवार देण्यात आले होते. या आठपैकी चार प्रभागात भाजपने, तीन प्रभागात शिवसेनेने, एक अखिल भारतीय सेना चा अध्यक्ष बनला आहे. मात्र पालिकेत सत्तेत नसणाऱ्या भाजपची छुपी युती पुन्हा एकदा पालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीत पहिला मिळाली, तर शिवसेनेनेसुद्धा महापौर निवडणुकीत भाजपने त्यांना केलेल्या मदतीची परतफेड या प्रभाग समिती निवडणुकीत मदत  केली.