मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक होत आहे. शिवसेनेतर्फे विश्वनाथ महाडेश्वर हे महापौरपदाचे तर हेमांगी वरळीकर या उपमहापौरपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत.

भाजपने आधीच या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केल्याने मुंबईत शिवसेनेचाच महापौर आणि उपमहापौर होणार हे जवळपास निश्चित आहे.

दरम्यान महापौर निवडीवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहणार आहेत.

औपचारिकता म्हणून महापौरपदासाठी काँग्रेसचे विठ्ठल लोकरे आणि उपमहापौरपदासाठी विन्नी डिसुजा यांनीही अर्ज दाखल केले आहेत. पण, एकूण 88 जणांचा गट असल्याने शिवसेना उमेदवारांचा विजय निश्चित आहे.

पण, त्याचवेळी विश्वनाथ महाडेश्वर यांच्या महापालिका घराचा वाद बाहेर आल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणाचा कोर्टाचा निकाल महाडेश्वर यांच्या विरोधात गेला, तर त्यांचं महापौरपद धोक्यात येण्याची शक्यता आहे

खरंतर 8 मार्चला म्हणजे आज मुंबई महापालिकेची मुदत संपत आहे. त्यामुळे 9 मार्चला नवा महापौर बसवणं अपेक्षित होतं. मात्र महापालिका आयुक्तांनी एक दिवस आधीच म्हणजे 8 मार्चला महापौरपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला.

महापालिकेतील पक्षीय बलाबल कसं आहे?

  • शिवसेना – 84 + 4 अपक्ष

  • भाजप – 82

  • काँग्रेस – 31

  • राष्ट्रवादी – 9

  • मनसे – 7

  • MIM – 3

  • सपा – 6

  • अखिल भारतीय सेना – 1


संबंधित बातम्या

शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार महाडेश्वर यांच्या अडचणीत वाढ

शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर अडचणीत!

मुंबई महापौर निवडणूक : पडद्यामागे नेमकं काय घडलं?

मुंबईत भाजप महापौरपदाची निवडणूक लढणार नाही!

शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वरांचा महापौरपदासाठी अर्ज दाखल

मुंबईच्या महापौरांची निवड ‘अशी’ होईल !

मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीतील फोडाफोडीचा इतिहास

मुंबईच्या महापौरांची निवड 8 मार्चलाच होणार

मुंबई महापौरपदाच्या निवडीसाठी तारखेचा घोळ