मुंबई: देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर झाला.  भाजपने 82 जागांवर विजय मिळवला असून, चार अपक्षांसह सर्वाधिक 86 जागा जिंकल्याचा दावा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला.

एकूण 227 पैकी 226 जागांचा निकाल जाहीर झाला. त्यापैकी शिवसेनेला 84, भाजप 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9, मनसे 7, MIM -3 , सपा 6,अखिल भारतीय सेना 1, अपक्ष 4, निवडून आले.

मुंबईतील बिग फाईट्स

गोरेगाव वॉर्ड क्रमांक 51 : स्वप्नील टेंबवलकर (शिवसेना) विजयी वि. विनोद शेलार (भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांचे बंधू)

वर्सोवा वॉर्ड क्रमांक 60 : योगराज दाभोळकर (भाजप) विजयी वि. यशोधर उर्फ शैलेश फणसे (शिवसेना, स्थायी समितीचे अध्यक्ष)

वर्सोवा वॉर्ड क्रमांक 68 : रोहन राठोड (भाजप) विजयी वि. देवेंद्र आंबेकर (शिवसेना, मूळचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते. या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेत आले)

विक्रोळी वॉर्ड क्रमांक 118 : उपेंद्र सावंत (शिवसेना) विजयी वि. मंगेश सांगळे (भाजप, मनसेचे माजी आमदार)

घाटकोपर वॉर्ड क्रमांक 127 : सुरेश पाटील (शिवसेना) विजयी वि. रितू तावडे (भाजप, विद्यमान नगरसेविका)

घाटकोपर वॉर्ड क्रमांक 132 : पराग शहा (भाजप, सर्वात श्रीमंत उमेदवार) विजयी. वि. प्रवीण छेडा (काँग्रेस, मुंबई महापालिकेतील जुनेजाणते नगरसेवक)

अणुशक्तीनगर, वॉर्ड क्रमांक 144 : अनिता पांचाळ (भाजप) विजयी वि. कामिनी शेवाळे (शिवसेना, खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी)

वडाळा, वॉर्ड क्रमांक 179 : मुफ्ती नियाझ वनू (काँग्रेस) विजयी वि. बाबुभाई भवानजी (भाजप, उद्योजक) आणि तृष्णा विश्वासराव (शिवसेना, मुंबई महापालिकेतल्या सभागृहनेत्या)

प्रभादेवी, वॉर्ड क्रमांक 194 : समाधान सरवणकर (शिवसेना) विजयी वि. संतोष धुरी (मनसे, मावळते नगरसेवक)

भायखळा, वॉर्ड क्रमांक 210 : सोनम जामसुटकर (काँग्रेस) विजयी वि. यामिनी जाधव (शिवसेना, विद्यमान नगरसेविका)

मलबार हिल वॉर्ड क्रमांक 217 : मीनल पटेल (भाजप) विजयी वि. युगंधरा साळेकर (शिवसेना, विद्यमान नगरसेविका)

मलबार हिल वॉर्ड क्रमांक 218 : अनुराधा पोतदार-सराफ (भाजप) विजयी वि. मीनल जुवाटकर (शिवसेना, विद्यमान नगरसेविका)

संबंधित बातम्या
पक्षनिहाय निकाल : 10 महापालिकांमध्ये कुठे कुणाला बहुमत?

BMC election result : मुंबई विजयी उमेदवारांची यादी

जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व निकाल!

मुंबईत कुणाचा महापौर बसणार? सत्तेची समीकरणं

मुंबईत अमराठी नगरसेवकांची संख्या वाढली!

ईश्वर चिठ्ठी भाजपच्या बाजूने, मुंबईत एक जागा वाढली

मुंबईत 'या' दिग्गजांना मतदारांचा दे धक्का

ठाण्यात पत्नीवर नारळ भिरकावणारे शिवसेना उमेदवार विजयी

मत देतो, पण झोपेची वेळ नका घेऊ, सदाशिव पेठेत भाजपला यश

आता कटुता पुरे झाली, सेना-भाजपने एकत्र यावं : चंद्रकांत पाटील