मुंबई : मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेचं बजेट तब्बल 37 हजार कोटी आहे. पण गेल्या पाच वर्षात मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनी संपत्तीच्या बाबतीत कोट्यवधींची उड्डाणं घेतली आहेत.


मागील पाच वर्षात नगरसेवकांच्या संपत्तीत दुपटी, तिपटीनेच नाही तर तब्बल पंचवीस पटींनी वाढ झाली आहे.

मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या संपत्तीत पाच वर्षात सर्वाधिक वाढ दिसते. श्रद्धा जाधव यांची संपत्ती तब्बल 25 पटींनी वाढली आहे.

फक्त सत्ताधारी नगरसेवकच नाही तर विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे.



नगरसेवक आणि संपत्ती

श्रद्धा जाधव, माजी महापौर                        पाच वर्षांपूर्वी : 1 कोटी 73 लाख             आता : 25 कोटी 18 लाख

प्रवीण छेडा,  विरोधी पक्षनेते                     पाच वर्षांपूर्वी : 8 कोटी 60 लाख             आता : 14 कोटी 4 लाख

तृष्णा विश्वासराव, सभागृहनेत्या              पाच वर्षांपूर्वी : 1 कोटी 2 लाख                आता : 6 कोटी 63 लाख

यशोधर फणसे, स्थायी समिती अध्यक्ष     पाच वर्षांपूर्वी : 4 कोटी 50 लाख             आता : 8 कोटी 40 लाख

स्नेहल आंबेकर, महापौर                           पाच वर्षांपूर्वी : 42 लाख 47 हजार          आता : 1 कोटी 28 लाख

मनोज कोटक, गटनेता भाजप                   पाच वर्षांपूर्वी :  2 कोटी 64 लाख           आता : 4 कोटी 13 लाख

रईस  शेख, गटनेते सपा                            पाच वर्षांपूर्वी : 37 लाख 80 हजार         आता : 2 कोटी 99 लाख

अलका केरकर, उपमहापौर                       पाच वर्षांपूर्वी : 4 कोटी                          आता : 5 कोटी 35 लाख