सात शिवसैनिकांचा अपघाती मृत्यू, उद्धव यांची विलेपार्लेतील सभा रद्द
एबीपी माझा वेब टीम | 09 Feb 2017 02:32 PM (IST)
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील विलेपार्लेमध्ये नियोजित प्रचारसभा रद्द करण्यात आली आहे. सात शिवसैनिकांचा रत्नागिरीजवळ अपघाती मृत्यू झाल्यामुळे ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी सायंकाळी विलेपार्लेमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार होती. मात्र बुधवारी मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ झालेल्या अपघातात विलेपार्लेतल्या 7 शिवसैनिकांचा मृत्यू झाला. गुरुवारी त्या सर्वांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्यानं उद्धव यांनी विलेपार्लेतली प्रचारसभा रद्द केली.