मुंबई : मुंबई महापालिकेसह राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 31 जानेवारीपूर्वी पूर्ण करायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी प्रशासन आणि राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे. निवडणुकीची पूर्व तयारी सुरु असताना बृहन्मुंबई महानगरपालिकेतील 'सहायक आयुक्त’ संवर्गातील रिक्त पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेअंती शिफारस केलेल्या चार सहायक आयुक्तांच्या पदस्थापनेचे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशान्वये आज (दिनांक 3 ऑक्टोबर 2025) जारी करण्यात आले आहेत.

Continues below advertisement

BMC New Officers : नवनियुक्त चार सहायक आयुक्तांच्या पदस्थापनांचे आदेश जारी 

अ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवडीने सहायक आयुक्त संवर्गात पदस्थापना विषयक चार आदेश पुढीलप्रमाणे आहेत. 

1)  संतोष गोरख साळुंखे - सहायक आयुक्त, सी विभाग2)  वृषाली पांडुरंग इंगुले - सहायक आयुक्त, एफ दक्षिण विभाग3)  योगेश रंजीतराव देसाई - सहायक आयुक्त, बी विभाग4)  आरती भगवान गोळेकर - सहायक आयुक्त, आर दक्षिण विभाग 

Continues below advertisement

ब) सहायक आयुक्त संवर्गात बदलीविषयक आदेश पुढीलप्रमाणे आहेत. 

1)  नितीन शुक्ला, सहायक आयुक्त (बी विभाग) तसेच सहायक आयुक्त के पूर्व (अतिरिक्त कार्यभार) - सहायक आयुक्त (के पूर्व विभाग)2)  संजय इंगळे, सहायक आयुक्त (सी विभाग) - नगर अभियंता विभागाकडे प्रत्यावर्तीत3)  महेश पाटील, सहायक आयुक्त, एफ दक्षिण विभाग - सहायक आयुक्त, एस विभाग4)  अलका ससाणे, सहायक आयुक्त, एस विभाग -  सहायक आयुक्त, बाजार विभाग5)  मनीष साळवे, सहायक आयुक्त, आर दक्षिण विभाग -  नगर अभियंता विभागाकडे प्रत्यावर्तीत

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सहायक आयुक्त संवर्गात एकूण 14 उमेदवारांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आली होती. यापैकी सहा उमेदवारांची यापूर्वीच सहायक आयुक्त पदावर पदस्थापना करण्यात आली आहे. तर आज आणखी चार सहायक आयुक्तांना पदस्थापना देण्यात आली आहे. उर्वरित 4 पैकी एक उमेदवार पूर्वीच्या कार्यसंस्थेकडून अद्याप कार्यमुक्त झालेले नाहीत. तर एक उमेदवार प्रसूती रजेवर आहेत. तसेच, दोन उमेदवार सद्यस्थितीत विभाग संलग्नता प्रशिक्षण घेत आहेत. विभाग संलग्नता प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची सहायक आयुक्त पदावर पदस्थापना करण्यात येईल. 

सहायक आयुक्त सारखे महत्त्वाचे पद दीर्घकाळ रिक्त ठेवणे संयुक्तिक होत नाही. यास्तव सद्यस्थितीत रिक्त असलेल्या सहायक आयुक्त पदाचा कार्यभार प्रशासकीय निकड व निर्णयानुसार उपप्रमुख अभियंता कार्यकारी अभियंता संवर्गातील अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे.