Continues below advertisement

मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर आता ठाकरेंचे अनिल परब (Anil Parab) उत्तर देणार आहेत. अनिल परब शनिवारी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांना उत्तर देणार आहेत. तसेच बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रासंबंधीही अनिल परब मोठा खुलासा करणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाल्यानंतरही दोन दिवस त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाताचे ठसे घेतल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला होता.

रामदास कदम यांनी या आधीही उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले. शिंदेंच्या दसरा मेळाव्यातही त्यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा आरोप केला होता. त्याला आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून उत्तर देण्यात येणार आहे.

Continues below advertisement

Balasaheb Thackeray Death : बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावर खुलासा होणार

अनिल परब आता रामदास कदम यांना नेमकं काय उत्तर देणार, कदमांचे आरोप कसे खोडून काढणार आणि बाळासाहेब ठाकरेंच्य मृत्यूपत्रावर नेमका काय खुलासा करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Ramdas Kadam Allegations : रामदास कदमांचा नेमका आरोप काय?

बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस घरात पडून होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतल्याचा दावा रामदास कदम यांनी केला. स्वतः उद्धव ठाकरेंनीच आपल्याला त्यावेळी ही माहिती दिल्याचा दावाही कदम यांनी केला. बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले गेले याची माहिती उद्धव ठाकरेंनी द्यावी असं आव्हानही कदम यांनी दिलं.

Ramdas Kadam Vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा

दसर मेळाव्यात रामदास कदम यांनी हा आरोप केला. तर त्याच्या दुसऱ्या दिवशीही पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्या आरोपांवर कायम असल्याचं सांगितलं. आपण भाषणाच्या ओघात बोललो, मात्र खरंच बोललो, असं रामदास कदमांनी सांगितलं. शिवाय स्वतःची आणि उद्धव ठाकरेंची नार्को चाचणी करावी, असं आव्हानही दिलं. शरद पवारांनीही त्यावेळी मृतदेह घरात ठेवण्यासंबंधी आक्षेप घेतल्याचा दावा रामदास कदम यांनी केला.

ही बातमी वाचा: