मुंबई : मुंबई महापालिकेच्या सायन प्रभागात शिवसेनेने गड राखला आहे. प्रभाग क्रमांक 173 च्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार रामदास कांबळे यांचा विजय झाला आहे.


शिवसेनेचे नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनानंतर प्रभाग क्रमांक 173 ची जागा रिक्त झाल्याने इथे पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या प्रभागात शुक्रवारी (6 एप्रिल) मतदान पार पडलं. तर आज निकाल जाहीर झाला.

शिवसेना-काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर
शिवसेनेच्या विरोधात काँग्रेसने शिवसेनेच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याने या पोटनिवडणुकीत रंगत निर्माण झाली होती. परंतु रामदास कांबळे यांनी
काँग्रेस उमेदवार सुनील शेट्ये यांना जोरदार टक्कर देत 845 मतांनी विजय मिळवला.

सायन पोटनिवडणूक : शिवसेनेविरोधात काँग्रेसची शिवसैनिकाला उमेदवारी

भाजपचा शिवसेनेला पाठिंबा
प्रभाग 21 मधील भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवार न देता भाजपला पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड भाजपाने प्रभाग क्रमांक 173 मध्ये उमेदवार न देता करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपने या प्रभागात आपला उमेदवार न देता शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्या उमेदवाराला किती मतं?



संबंधित बातम्या

नगरसेवकपदाच्या पोटनिवडणुकीसाठी विधिमंडळात शिवसेनेची धावाधाव

शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचं निधन