BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेचा (Mumbai Maha Paika)अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये मुंबईकरांच्या आरोग्याला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळेच आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी एकूण अर्थसंकल्पातील 12 टक्के आर्थिक निधी हा आरोग्यवस्थेसाठी खर्च केला जाणार आहे.
आरोग्य सुविधांवरील अंदाजित खर्च 6309.38 कोटी इतका असून तो एकूण अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 12% इतका आहे. मागील वर्षीचा अर्थसंकल्प विचारात घेतला तर आरोग्य विभागाच्या अर्थसंकल्पात पाचशे कोटीने कपात करण्यात आली आहे. कारण मागील वर्षी अर्थसंकल्प सादर करत असताना कोरोनाच्या काळात भरीव तरतूद करण्यात आली होती.
मुंबईकरांच्या आरोग्यासाठी अर्थसंकल्पात आरोग्य विषयक खर्चासाठी कशाप्रकारे तरतूद
भगवती रुग्णालयाचा पुनर्विकास ₹110 कोटी रुपये खर्च केले जाणार
गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाचे बांधकाम ₹110 कोटी रुपये खर्च केले जाणार
एम. टी. अगरवाल रुग्णालयाचे विस्तारीकरण ₹95 कोटी रुपये खर्च केले जाणार
कांदिवली (प) येथील शताब्दी रुग्णालयाचे प्रस्तावित बांधकाम ₹75 कोटी रुपये खर्च केले जाणार
सायन रुग्णालय इमारतीचा पुनर्विकास ₹70 कोटी रुपये खर्च केले जाणार
एस विभाग, भांडूप येथील प्रस्तावित मल्टी स्पेशालिटी महानगरपालिका रुग्णालय ₹60 कोटी रुपये खर्च केले जाणार
वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयाचे विस्तारीकरण ₹53.60 कोटी रुपये खर्च केले जाणार
एल विभागातील संघर्ष नगर येथे, रुग्णालयाकरीता राखीव असलेल्या भूखंड क्र. 11A/4 चा विकास ₹35 कोटी रुपये खर्च केले जाणार
ऍक्वर्थ कृष्ठरोग रुग्णालयाच्या आवारात वसतीगृहाचे बांधकाम ₹28 कोटी रुपये खर्च केले जाणार
नायर दंत महाविद्यालयाचे विस्तारीकरण ₹17.50 कोटी रुपये खर्च केले जाणार
ई विभाग, कामाठीपुरा येथील सिद्धार्थ / मुरली देवरा नेत्र रुग्णालयाचा पुनर्विकास ₹12 कोटी रुपये खर्च केले जाणार
ओशिवरा प्रसूतीगृहाची ₹9.50 कोटी दुरुस्ती/ पुनर्बांधकाम रुपये खर्च केले जाणार
के.ई.एम. रुग्णालयातील प्लाझ्मा सेंटरची दर्जोन्नती ₹7 कोटी रुपये खर्च केले जाणार
आर. एन. कूपर रुग्णालय महाविद्यालयाचे बांधकाम ₹5 कोटी रुपये खर्च केले जाणार
टाटा कंपाऊंड आणि हाजी अली वसतीगृहाचे बांधकाम ₹2 कोटी रुपये खर्च केले जाणार
के. ई. एम. रुग्णालयामध्ये प्रोटॉन थेरेपी कर्करोग रुग्णालयाच्या बांधकामाकरता तरतूद ₹1 कोटी रुपये खर्च केले जाणार
ही बातमी देखील वाचा
Mumbai Budget: मुंबईचं बजेट 'या' आठ राज्यांपेक्षा जास्त... म्हणूनच महापालिकेवर सगळ्यांचाच डोळा