मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या घरी बीएमसीकडून कारवाई केली जाऊ शकते. बीएमसीने कंगनाच्या खार परिसरात असलेला फ्लॅट पाडण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने कंगना रनौतला नोटीस बजावली होती. या नोटिसमध्ये असं म्हटलं होतं, फ्लॅटमध्ये चुकीच्या पद्धतीने बदल करण्यात आले आहेत. यामध्ये नियमांचे उल्लंघन केले गेलं आहे.
फ्लॅटमध्ये आठ ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बदल- बीएमसी
कंगना रनौतने त्यावेळी दिवाणी न्यायालयात जाऊन कारवाईवर स्थगिती मिळवली होती. आता बीएमसीने कॅविएट दाखल केली आहे. स्थगिती आदेश रद्द करावा आणि आम्हाला चुकीच्या पद्धतीने केलेलं बांधकाम पाडण्याची परवानगी द्यावी, असं बीएमसीने म्हटलं आहे. खार परिसरातील डीबी ब्रिज नावाच्या इमारतीत पाचव्या मजल्यावर कंगनाचं घर आहे. या घरात आठ ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बदल करण्यात आले आहेत. किचन आणि बाल्कनीतही चुकीच्या बांधकाम केल्याचं बोललं जात आहे.
बीएमसीने कंगनाच्या कार्यालयातील अवैध बांधकाम पाडलं
मुंबईतील कंगना रनौतच्या 'मणिकर्णिका फिल्म्स' कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम बीएमसीने पाडलं. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने यावर स्थगिती दिली. या प्रकरणी उद्या उच्च न्यायालय पुन्हा सुनावणी होणार आहे. कंगनाच्या कार्यालयात बेकायदा बांधकाम पाडण्यात घाई झाल्याबद्दल हायकोर्टाने बीएमसीना जाब विचारला आहे. उद्या बीएमसीला याचे उत्तर द्यावे लागणार आहे.
आज मेरा घर टुटा, कल तेरा घमंड टुटेगा; मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत कंगनाची टीका
मुखमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत, "आज मेरा घर टुटा, कल तेरा घमंड टुटेगा" असं कंगनाने म्हटलं. कंगनाने एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, "उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटते फिल्म माफियांसोबत मिळून तुम्ही माझे घर पाडून मोठ बदला घेतला आहे. आज माझे घर तुटले आहे, उद्या तुझा अहंकार तुटेल. हे काळाचे चक्र आहे, लक्षात ठेवा हे नेहमीच सारखं नसतं. मला वाटतं तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले आहेत. कारण काश्मिरी पंडितांसोबत काय घडलं हे मला आज कळलं. आज मी देशातील जनतेला वचन देतो की मी केवळ अयोध्येवरच नाही तर काश्मीरवरही एक चित्रपट बनवणार आहे. आणि माझ्या देशवासियांना जागे करणार आहे. कारण जे माझ्याबाबतीत घडलं ते कुणासोबतही घडेल. उद्धव ठाकरे ही क्रुरता आणि दहशत माझ्यासोबत घडली हे चांगलं झालं. जय हिंद जय महाराष्ट्र.
Majha Vishesh | कंगनाचा खांदा वापरुन सुडाचं राजकारण कोण करतंय?
महत्त्वाच्या बातम्या :