मुंबई : दोन दिवसांवर आलेली मुंबई मॅरेथॉन स्पर्धा अडचणीत सापडली आहे. कारण 24 तासात 5 कोटी 48 लाख रुपये भरण्याचे आदेश मुंबई महापालिकेने आयोजकांना दिले आहेत.
येत्या रविवारी म्हणजेच 15 जानेवारीला 14 वी मुंबई मॅरेथॉन पार पडणार आहे. मुंबई मॅरेथॉनचं आयोजन प्रोकॅम इंटरनॅशनल लिमिटेड करते.
होर्डिंग, बॅनर्स, लेझर शो आणि जाहिरातीपोटी 5,48,30,610 रुपये भरा, असं महापालिकेनं आयोजकांना सांगितलं आहे. महापालिकेच्या ए वॉर्डचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी आयोजकांना ही नोटीस पाठवली आहे.
जर आयोजकांनी पैसे भरले नाही तर मॅरेथॉनच्या सर्व जाहिराती काढण्यात येतीस. तसंच कायदेशी कारवाई करु, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
मॅरेथॉन हा सामाजिक उपक्रम नव्हे तर व्यावसायिक हेतूने चालवत असल्याचंही महापालिकेने म्हटलं आहे.