पावसाळ्यात पाणी तुंबलं, तर मुंबईकरांनी सहन करावं : बीएमसी
एबीपी माझा वेब टीम | 25 May 2018 07:37 PM (IST)
पावसाळ्यातील कामादरम्यान जर पाणी तुंबलं, तर मुंबईकरांनी सहन करावं असं वक्तव्य प्रशासनाकडूनच करण्यात आलं आहे.
मुंबई : सध्या पाण्याचा संपूर्ण निचरा होण्यासाठी मुंबईत पर्जन्यजलवाहिन्या टाकण्याचं काम सुरु आहे. मात्र पावसाळ्यात या कामादरम्यान जर पाणी तुंबलं, तर मुंबईकरांनी सहन करावं असं वक्तव्य प्रशासनाकडूनच करण्यात आलं आहे. स्थायी समितीत पर्जन्यजलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता विद्याधर खंडकर यांनीच तुंबलेलं पाणी सहन करण्याचं आवाहन मुंबईकरांना केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.