मुंबई: पेंग्विनच्या देखभाल करणाऱ्या स्कायवे कंपनीने योग्य काम न केल्याने आणि योग्य प्रतिसाद न दिल्याने 1 कोटी 40 लाख बँक गॅरंटी महापालिकेने जप्त केली आहे. अशी माहिती मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे.


परदेशी कंपनी स्कायवे कंपनीनं पेंग्विनच्या मृत्यूप्रकरणी हात झटकले आहेत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

जिवाणूचा संसर्ग झाल्यानं या मादी पेंग्विनचा मृत्यू झाला होता. साऊथ कोरियाच्या कोएक्स अॅक्वेरिअममधून 8 पेंग्विन राणीच्या बागेत आणले होते. विशेष म्हणजे साऊथ कोरियासारखंच तापमान तयार करण्यासाठी आणि पेंग्विनची खास काळजी घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन एजन्सीला जवळपास 8 कोटींचं कंत्राट देण्यात आलं होतं.