Dadar Shivaji Park Zoo: दादरच्या प्राणी संग्रहालयातील (Dadar Zoo) अनधिकृत बांधकामाला (Unauthorized Construction) महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्कमधील (Shivaji Park) स्विमिंग पूलमध्ये याच प्राणी संग्रहालयातून मगर आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं  प्राणी संग्रहालयाविरोधात महापालिका आणि वनविभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता पालिका प्रशासनाला नोटीस बजावण्यात आली आहे.


दादर प्राणीसंग्रहालयातील बांधकामावर नोटीस बजावण्यात आली आहे. या प्राणीसंग्रहालयात जे शेड्स उभारण्यात आले आहेत, त्याला MRTP कायद्यांतर्गत पालिकेनं नोटीस बजावली आहे. दादरमधील प्राणीसंग्रहालय शिवाजी पार्क परिसरात आहे. याच प्राणीसंग्रहालयातील मगर शेजारी असलेल्या महात्मा गांधी जलतरण तलावात (Mahatma Gandhi Memorial Swimming Pool)  गेल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. प्राणीसंग्रहालयातूनच ही मगर आल्याचा आरोप मनसे आणि स्थानिकांनी केला होता. तसेच कारवाईची मागणीही करण्यात आली होती. त्याचप्रमाणे प्राणीसंग्रहालयाच्या मालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेने केली होती. दरम्यान, वनविभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 


आज महापालिकेनं दादर प्राणीसंग्रहालयाला जी नोटीस धाडली आहे, ती अनधिकृत बांधकामाबाबतची आहे. त्यासोबतच प्राणीसंग्रहालयातील एक अनधिकृत बांधकामही पालिकेच्या वतीनं पाडण्यात आलं आहे. 


शिवाजी पार्कच्या स्विमिंग पूलमध्ये सापडलेली मगर दादर प्राणीसंग्रहालयातलीच?


मुंबईच्या शिवाजी पार्कमधल्या (Shivaji  Park) महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये (Mahatma Gandhi Memorial Swimming Pool)  एक मगर आढळली. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती. एका कर्मचाऱ्याने मगरीला पाहिल्यानंतर तिला पकडून ड्रममध्ये ठेवलं. यादरम्यान मगरीने एका कर्मचाऱ्याला चावा देखील घेतला. हाटे 5.30 वाजताच्या सुमारास तरण तलावाचे निरीक्षण करीत असताना ऑलम्पिक आकाराच्या  आणि शर्यतीसाठीच्या तरण-तलावात (Olympic size Racing Swimming Pool) मगरीचे पिल्लू आढळून आले होते. त्यानंतर सहा तासांनी मगर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली.   याआधी देखील अजगर आणि सापासारखे अनेक प्राणी त्याच प्राणीसंग्रहालयातून सुटून बाहेर पडल्याने लोकांमध्ये घबराट पसरली होती, त्यामुळे या प्राणीसंग्रहालयावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी देखील अशीच मागणी केली आहे.


सध्या ही जागा वाईल्ड लाईफ वाँडरर्स नेचर फाउंडेशन यांच्या मालकीची आहे, तर ही जागा नंदकुमार मोघे यांच्या मालकीची आहे. नंदकुमार मोघे आयएएस ऑफिसर होते, ते महाराष्ट्र सरकार मध्ये वाईल्ड लाईफ ॲडव्हायझर, मुंबई महानगरपालिकेमध्ये वाइल्डलाइफ अँड झू अडवायझर, महाराष्ट्र सरकारच्या टायगर सफारीचे को चेअरमन अश्या विविध मोठ्या पदांवर त्यांनी काम केलं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि नंदकुमार मोघे यांचे घरचे संबंध होते. महाराष्ट्रातील अनेक अभयारण्य आणि राष्ट्रिय उद्याने तयार करण्यात बाळासाहेबांनी मोघे यांना प्रोत्साहन दिले होते, सध्या मोघे घरीच असतात, त्यांचा मुलगा युवराज मोघे ही फाउंडेशन आणि प्राणी संग्रहालय सांभाळतो. 


पाहा व्हिडीओ : Dadar Zoo :दादर प्राणी संग्रहालयातील अनधिकृत बांधकामाला महापालिका प्रशासनाची नोटीस