जागृती पाटील या शिवसेनेत येण्यासाठी उत्सुक होत्या. मात्र सेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना विरोध झाला. त्याचा फटका पोटनिवडणुकीत शिवसेनेला बसला. जागृती पाटील यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव केला.
जागृती पाटील या शिवसेनेत प्रवेश करणार होत्या. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत चर्चाही झाली होती. मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर ढाके यांनी जागृती पाटील यांना विरोध केला होता.
आमदार अशोक पाटील यांच्या पत्नीला तिकीट देण्यासाठी लीलाधर ढाके यांनी प्रयत्न केले. पण आमदारांच्या पत्नीचा पराभव झाल्याने शिवसेनेत नाराजी आहे.
इतिहासात पहिल्यांदाच पोटनिवडणूक हरल्यानं शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
मिनाक्षी पाटील यांचा पराभव
मुंबईतील प्रभाग क्र. ११६मध्ये (भांडुप पश्चिम) पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव केला.
काँग्रेसच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली होती. जागृती पाटील या प्रमिला पाटील यांच्या सून आहेत. मात्र, या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून न लढता भाजपचा झेंडा हाती घेतला.
मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल = 227
- शिवसेना अपक्षांसह – 84 + अपक्ष 4 अपक्ष = 88
- भाजप अभासे आणि एक अपक्षासह – 83+अपक्ष 2= 85
- कॉंग्रेस – 30
- राष्ट्रवादी कॉंग्रेस – 9
- मनसे – 7
- सपा – 6
- एमआयएम – 2
संबंधित बातम्या