मुंबई : मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी तयार झाली असून, 1 फेब्रुवारीला पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या 31 च्या 31 विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
ज्या जागांवर उमेदवार निश्चित आहेत आणि वादाची कोणतीही शक्यता नाही, अशा जागांवरील उमेदवार भाजपकडून घोषित केले जाणार आहेत. ज्या जागांवर वाद होऊ शकतात, अशा काही जागांवर भाजपकडून अधिकृत उमेदवाराला थेट AB फॉर्म 2 तारखेपर्यंत देण्याची शक्यता आहे.
काही जागांवर समोरच्या पक्षाचा विशेषत: शिवसेनेचा कोण उमेदवार आहे, हे पाहून भाजप उमेदवार ठरवणार आहे. उमेदवार फुटू नये म्हणून भाजपचने रणनीती आखली आहे.