मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या मुंबईतील निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं.


यानिमित्ताने नारायण राणेंची भाजपशी जवळीक वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाविषयी चर्चांना आणखी वेग आला आहे. दरम्यान ‘गणराया नेहमीच काहीतरी नवनवीन घडवतो असतो. फक्त पात्र वेगळी असतात. यावेळचं पात्र कोणतं असेल हे लवकरच कळेल’ असं सूचक विधान काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर केलं होतं.

नारायण राणेंच्या मुंबईतल्या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. हा फोटो आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरुन शेअरही केला होता.

‘वैयक्तिकरित्या गणपतीकडे काही मागावं, असं त्याने काही ठेवलं नाही. गणरायाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री आले. दर्शन घेतलं आणि 15-20 मिनिटं थांबून निघाले. या व्यतिरिक्त काही चर्चा झाली नाही.’ असं राणे म्हणाले.

संबंधित बातम्या :

नारायण राणेंचा भाजप प्रवेश 27 ऑगस्टला?


राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा आणि नितेश राणेंचा व्हॉट्सअॅप डीपी!


गडकरींवर स्तुतिसुमनं, नारायण राणे भाजपच्या वाटेवर?


अहमदाबादमध्ये अमित शाह-मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा, राणेही अहमदाबादमध्येच?