यादी जाहीर न करताच भाजपचे उमेदवारांना थेट अर्ज भरण्याचे आदेश : सूत्र
एबीपी माझा वेब टीम | 01 Feb 2017 11:20 PM (IST)
मुंबई : भाजपने यादी जाहीर न करता , त्या त्या वॉर्डमधील उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आहे. ज्या 61 जागांवर वाद नाही, त्या 61 जागांची यादी भाजपने जाहीर केली आहे. आमदार राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित, खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार आणि आमदार विद्या ठाकूर यांचा मुलालाही उमेदवारी दिल्याचं यादीमध्ये दिसत आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नातेवाईकांना तिकीट देऊ नये, असं निवडणुकीपूर्वीच स्पष्ट सांगितलं होतं. मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पहिल्याच 61 जागांमध्ये चार आमदार, खासदार पुत्रांना उमेदवारी देण्यात आली आहे.