मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा वाटा यामध्ये  मोठा वाटा आहे. हेच गिरीश महाजन आज एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर उपस्थित होते. भाजपला विरोधी पक्षातील नेत्यांची गरज का लागते? याचा आगामी निवडणुकीत भाजपला काय फायदा होईल? मित्रपक्ष आणि भाजपमधील इतर नेते या इनकमिंगमुळे नाराज होणार नाहीत का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली.



LIVE UPDATE




  • काँग्रस म्हणजे वादळात भरकटलेलं जहाज : गिरीश महाजन

  • भाजपमध्ये यावं ही सर्वांची इच्छा आहे : गिरीश महाजन

  • नवीन लोक पक्षात घेतांना स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं जातं : गिरीश महाजन

  • आघाडीचे 50 हून अधिक खासदार संपर्कात आहेत : गिरीश महाजन

  • शिवसेना-भाजप एकत्र निवडणूक लढवणार : गिरीश महाजन

  • शिवसेना-भाजपचं ठरलं आहे : गिरीश महाजन

  • जागां वाटपांचा निर्णय मुख्यमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शाह घेतील : गिरीश महाजन

  • आघाडीचे केवळ 40 आमदार निवडून येतील : गिरीश महाजन

  • मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे जनता समाधानी आहे : गिरीश महाजन

  • भाजपमध्ये आलेले नेते विनाअट पक्षात आले आहेत : गिरीश महाजन

  • पक्षांतरासाठी भाजपला पहिली पसंती : गिरीश महाजन

  • बाहेरुन आलेल्या नेत्यांना आपापल्या भागाचा विकास करायचा आहे : गिरीश महाजन

  • सर्वांना राज्यातील नेतृत्व आणि केंद्रीय नेतृत्वावर विश्वास आहे : गिरीश महाजन

  • राष्ट्रवादी काँग्रेस परिवारवादात गुरफटली : गिरीश महाजन

  • राष्ट्रवादीच्या या परिस्थितीला अंतर्गत कलह जबाबदार : गिरीश महाजन

  • शरद पवारांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना नाराज केल्याने ते आमच्याकडे आले : गिरीश महाजन

  • भाजपमधील नेत्यांकडे, कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत नाही : गिरीश महाजन

  • एकनाथ खडसे यांच्यावर अजिबात अन्याय झालेला नाही : गिरीश महाजन

  • एकनाथ खडसे यांना स्वत:हून मंत्रिपदाचा राजीनामा दिला : गिरीश महाजन

  • एकनाथ खडसे भाजपचे दिग्गज नेते आहेत, त्यांना निश्चित न्याय मिळेल : गिरीश महाजन

  • अमोल कोल्हे आल्याने महाराष्ट्र बदलणार नाही, गिरीष महाजनांची राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेवर टीका : गिरीश महाजन

  • सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरु आहे : गिरीश महाजन

  • गेल्या तीन-साडेतीन वर्षापासून चौकशी सुरु आहे : गिरीश महाजन

  • अनेक ठेकेदार, अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे : गिरीश महाजन

  • सिंचन घोटाळ्याचा व्याप मोठा आहे, त्यामुळे चौकशीसाठी वेळ लागत आहे : गिरीश महाजन

  • भाजपने सामान्य माणसांसाठी अनेक चांगल्या योजना राबवल्या : गिरीश महाजन

  • लोकांसाठी काम केलं म्हणून भाजपला मोठं मताधिक्य मिळत आहे : गिरीश महाजन

  • मेक इन इंडियाच्या माध्यामातून बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे  : गिरीश महाजन