फडणवीस म्हणाले की, भारतीय जनता पक्षात येऊ पाहणाऱ्या नेत्यांना पक्षात घ्यावेच लागेल. अर्थात आम्ही थोडं तपासून घेऊ. 15 टक्के लोक आपण इतर पक्षातून घेतो, त्यामुळे आपल्या पक्षातील लोकांनी डिस्टर्ब होण्याचे कारण नाही.
पाहा काय म्हणालेत मुख्यमंत्री
फडणवीस यांनी सांगितले की, कोणत्याही नेत्याला उमेदवारी देताना निकष ठरलेले आहेत. मतदारसंघाच्या सर्वेक्षणाच्या अभ्यासातून निर्णय घेतले जातात. उमेदवारी मिळवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना कोणीही निवेदने देऊ नका. निवेदनांमुळे आपल्याकडे उमेदवारी मिळत नाही. जो योग्य असेल, आपण त्यालाच तिकीट देतो.
मुंबईला येईल त्याचा एक मार्क कट
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, योग्यतेच्या आधारावर आपल्या पक्षात उमेदवारी दिली जाते. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी कोणीही मुंबईला येऊ नका. जो मुंबईला येईल, त्याचा एक मार्क तिथेच वजा केला जाईल.
आपल्या पक्षात कोणीही कोणाचा जवळचा आहे म्हणून त्याला तिकीट मिळणार नाही. पक्षात सर्व काही चांगलं चाललंय, मनभेद करुन घेऊ नका. आपण पराभुतांसमोर लढतोय, परंतु विरोधकांना कमकुवत समजू नका. पुढची 10-15 वर्षे आपल्याला त्यांना विरोधी पक्षाचं ट्रेनिंग द्यायचं आहे, हे लक्षात ठेवा.
मी फक्त भाजपचाच नाही तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस