मुंबई : मुंबई महापालिकेत भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदी गणेश खणकर आणि श्रीनिवास त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक दिग्गजांना मागे सारुन स्वीकृत नगरसेवकपदी खणकर आणि त्रिपाठी यांची वर्णी लागली आहे.

भाजपकडून पालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेकांची नावं स्वीकृत सदस्याच्या रेसमध्ये होती. यामध्ये भाजप नेते आशिष शेलार यांचे भाऊ विनोद शेलार, प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर, रितू तावडे यांसह अनेक दिग्गजांचा समावेश होता. पण, या सर्वांना बाजुला सारुन भाजपनं अगदीच अनपेक्षित नियुक्त्या केल्या.

स्वीकृत नगरसेवक झालेल्या गणेश खणकर यांना पालिका निवडणुकीत तिकीट नाकारुन ते प्रकाश दरेकरांना देण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांना स्वीकृत नगरसेवकपद देऊन न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर त्रिपाठींच्या रुपानं उत्तर भारतीय चेहऱ्याला समाविष्ट करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :


शिवसेनेची माघार, मनसेचे दिलीप लांडे बिनविरोध


मुंबईतील 17 पैकी 8 प्रभाग समित्यांचा निकाल हाती, कुठे कोण विजयी?


मुंबईत प्रभाग समितीच्या निवडीसाठी शिवसेना-मनसे युती