मुंबई : सरकार अल्पमतात येण्याची भीती असल्यामुळे 19 विरोधी आमदारांचं निलंबन केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.


जितेंद्र आव्हाडांसह 19 आमदार 9 महिन्यांसाठी निलंबित

अर्थसंकल्पादरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात गदारोळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं 9 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये काँग्रेसच्या 9 आणि राष्ट्रवादीच्या 10 आमदारांचा समावेश आहे.

"शिवसेना अर्थसंकल्पाविरोधात जाण्याची भीती भाजपला होती. त्यामुळे सरकारने विरोधी पक्षाच्या मोजून 19 आमदारांचं निलंबन केलं," असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

मतदानाच्या भीतीने 19 आमदारांचं निलंबन?

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "विरोधी पक्षाचे आमदार आणि शिवसेनेच्या आमदारांनी सरकारविरोधात मतदान केलं असतं तर अल्पमतात आलं असतं. बजेटमध्ये सरकारचा पराभव झाला तर राजीनामा द्यावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने विरोधी पक्षाचे मोजून आमदार निलंबित केले."

"आमदारांच्या निलंबनामुळे शिवसेनेने विरोधी मतदान केलं तरी भाजप आणि अपक्ष आमदारांना बहुमत मिळेल आणि सरकार धोक्यात येणार नाही, याची भाजपला खात्री होती. सुरुवातीला 21 आमदारांची नावं घेतली. नंतर तेवढ्या आमदारांची गरज नसल्याचं समजल्यानंतर तो आकडा 19 करण्यात आला," असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

19 आमदारांचं निलंबन : कोण काय म्हणालं?

आमदारांच्या निलंबनाला शिवसेनेचा विरोध
विधानसभेतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 19 आमदारांच्या निलंबनाला शिवसेनेने विरोध केला आहे. त्यासाठी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. आमदारांचं निलंबन मागे घ्या अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

कर्जमाफीवरुन निलंबन चुकीचं, आमदारांच्या निलंबनाला शिवसेनेचा विरोध

निलंबनाची कारवाई रद्द करण्यासाच्या मागणीसाठी शिवसेना शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलं आहे.

हे आमदार निलंबित

काँग्रेसचे निलंबित आमदार

  1. अमर काळे – काँग्रेस,  आर्वी मतदारसंघ, वर्धा

  2. विजय वडेट्टीवार- काँग्रेस, ब्रह्मपुरी, चंद्रपूर

  3. हर्षवर्धन सकपाळ – काँग्रेस, बुलडाणा

  4. अब्दुल सत्तार – काँग्रेस, सिल्लोड, औरंगाबाद

  5. डी.पी. सावंत – काँग्रेस, नांदेड उत्तर

  6. संग्राम थोपटे – काँग्रेस, भोर, पुणे

  7. अमित झनक – काँग्रेस, रिसोड, वाशिम

  8. कुणाल पाटील – काँग्रेस, धुळे ग्रामीण

  9. जयकुमार गोरे – काँग्रेस, माण – सातारा


www.abpmajha.in 

राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार

  1. भास्कर जाधव – राष्ट्रवादी- गुहागर मतदारसंघ, रत्नागिरी

  2. जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी, कळवा, ठाणे

  3. मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी काँग्रेस, गंगाखेड, परभणी

  4. संग्राम जगताप – राष्ट्रवादी, अहमदनगर

  5. अवधूत तटकरे – राष्ट्रवादी, श्रीवर्धन, रायगड

  6. दीपक चव्हाण – राष्ट्रवादी, फलटण – सातारा

  7. नरहरी जिरवाळ – राष्ट्रवादी काँग्रेस  दिंडोरी, नाशिक

  8. वैभव पिचड- राष्ट्रवादी, अकोले – अहमदनगर

  9. राहुल जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीगोंदा अहमदनगर

  10. दत्तात्रय भरणे – राष्ट्रवादी काँग्रेस, इंदापूर, पुणे


पाहा व्हिडीओ