तर भाजपच्या 88 जागा मुंबईत निवडून आल्या असत्या..
एबीपी माझा वेब टीम | 23 Feb 2017 11:34 PM (IST)
मुंबई : मुंबई महापालिकेत भाजपने शिवसेनेला कडवी झुंज दिली. 227 पैकी शिवसेनेच्या 84, तर भाजपच्या 82 जागा निवडून आल्या. मात्र सहा जागांवर भाजपला निसटता पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे भाजपच्या कदाचित 88 जागा निवडून आल्या असत्या, आणि तो मुंबईत नंबर वन पक्ष ठरला असता. देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेसाठी यंदा विक्रमी 55.28 टक्के मतदान झालं. त्यातच शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यामुळे अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली. काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा मनसेनेही जोरदार टक्कर दिल्यामुळे तिरंगी किंवा चौरंगी मुकाबला झाला. मात्र भारतीय जनता पक्षाने मुंबईत जोरदार मुसंडी मारली. भाजपने कमी मताच्या फरकाने गमावलेल्या जागा वॉर्ड 4 - कमला राज पुरोहित यांचा 17 मतांनी पराभव वॉर्ड 7 - योगिता पाटील यांचा 199 मतांनी पराभव वॉर्ड 82 - संतोष केळकर यांचा 40 मतांनी पराभव वॉर्ड 87 - महेश पारकर यांचा 34 मतांनी पराभव वॉर्ड 160 - लीना शुक्ला यांचा 19 मतांनी पराभव वॉर्ड 178 - जैसल कोठारी यांचा 84 मतांनी पराभव https://twitter.com/ShelarAshish/status/834770051525988354