मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरगुती गणपतीच्या दर्शनानं शाह यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली.
शेलारांकडून अमित शाह 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेण्यासाठी रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत आशिष शेलार, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. अमित शाह यांचा मुंबई दौरा मंत्रिमंडळ फेरबदलासाठी महत्वाचा असल्याचं मानलं जात आहे.
दरम्यान, गणराया नेहमीच काहीतरी नवनवीन घडवतो, असं सूचक विधान नारायण राणे यांनी केलं आहे. राणेंच्या संभाव्य भाजपप्रवेशाच्या चर्चांवर हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातं. अमित शाहांच्या दौऱ्यादरम्यान राणेंचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.