मुंबई : राज्यपालांच्या (Governor Bhagatsingh Koshyari) अधिकाराबाबत बोलू शकत नाही. राज्यपालांना उलटसुलट बोलायचा अधिकार महाविकास आघाडीचा आहे. नियमांमध्ये बदल करून तुम्ही तारीख मागत आहात. दोनदा पत्र देऊन देखील तुम्ही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतली नाही. असं करणं त्यांनी राज्यपालांचा किंबहूना घटनेचा अपमान केला आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू शकते, असं भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे. राज्यपाल हे स्वायत्त पद आहे, त्यांनी काय करायचं हे तेच ठरवतील, असं पाटील म्हणाले. 


पीएचडी होईल इतके गोंधळ सरकारने केले
चंद्रकांत पाटील म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था कधी होणार हा प्रश्न आहे. वर्षभरापासून निवडणुका पेंडिंग आहेत. 6 जिल्हा परिषदा मधील निवडणूका ओबीसी आरक्षणमुळे रद्द झाल्या. सगळे गोंधळ राज्य सरकार करत आहे. पेपर फुटी, शाळा सुरू करण, एसटी संप असे अनेक मुद्दे आहेत. पीएचडी होईल इतके गोंधळ या सरकारने केले आहेत, असं पाटील म्हणाले.  आता राज्य सरकारने जे निवडणूका पुढे ढकलण्यासाठी कारण दिलं होतं. ते कोर्टात टिकेल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे, असं ते म्हणाले. 


चंद्रकांत पाटील म्हणाले की, सरकार कृत्रिम रित्या तयार झाल्यानंतर ते कसे वापरायचे हे त्यांच्या हातात आहे. नारायण राणे यांना अटक केली काय झालं पुढे. कोर्टाने त्यांना फटकारलं. आता त्यांच्या हातात सत्ता आहे. त्यामुळे ते पुढे काय करतील हे सांगता येत नाही. मात्र आमचा कोर्टावर विश्वास आहे, असं ते म्हणाले. 


पाटील यांनी म्हटलं की, गोपीचंद पडळकर यांच्या हल्ल्याची क्लिप व्हायरल झाली आहे. याबरून सर्व नागरिक असुरक्षित आहेत अशी परिस्थिती आहे. जर आमदारांची ही परिस्थिती असेल तर मग सर्वसामान्य नागरिकांची काय परिस्थिती असेल. आम्ही विधानसभा आणि विधानपरिषदेत विषय मांडणार आहे, असं ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या


ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोच, सरकारची भूमिका; आज ठराव, मध्यप्रदेश पॅटर्न राबवणार?



विधिमंडळ परिसरात कोरोनाचा उद्रेक; आत्तापर्यंत 35 जणांना कोरोनाची लागण 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha