मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून भाजप (BJP) नेतेही मुंबई महापालिका जिंकण्यासाठी रणनीती आखत आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम (Amit Satam) यांनी दोनच दिवसांपूर्वी ठाकरे बंधूंवर जहरी टीका केली होती. मुंबई महापालिका (Mumbai) लुटणारे हे डाकू आहेत, असे म्हणत साटम यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं होतं. त्यानंतर, आता मुंबई व्हिजन नावाच्या एका कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. मराठी-हिंदी भाषेच्या, शाळेतील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर भाष्य करत त्यांनी शिवसेना-मनसेवर हल्लाबोल केला. 

Continues below advertisement

मराठी टक्का आज मुंबईमध्ये 35 टक्के आहे, आधी फक्त मराठी माणसाच्या गप्पा व्हायचा आता कामं होत आहेत. मुंबईतील बीडीडी चाळीचं संपूर्ण काम हे देवेंद्र फडणवीस ह्यांनी केलं. पण, काही लोक निवडणुकीनंतर मराठी माणसांचा वापर करताता. किती मराठी माणसाला महानगरपालिकेची कॉन्ट्रॅक्ट मिळाली, आम्ही मराठी तरुणांना नोकऱ्या देत आहोत, त्याचबरोबर स्टार्टअप इंडिया मध्ये त्यांना प्रोत्साहन देतोय. पण काही लोक फक्त मराठी माणसांचा आणि तरुणांचा राजकारणासाठी फायदा घेतात, असे म्हणत साटम यांनी ठाकरेंवर टीका केली.   

21,000 कोटी रुपये खड्ड्यांवर खर्च करून देखील रस्ते तसेच असतात, याची जगभरात चर्चा आहे. पण आमचं सरकार आल्यावर ते सर्व रस्ते आता योग्य पद्धतीने बनले आहोत. तुम्ही तुमच्या मुलांना बॉम्बे स्कॉटिश शाळेमध्ये टाकलं तुमची मुलं जर्मन आणि इंग्लिश शिकली. मग, तुमचा हिंदीला विरोध का? त्याचबरोबर ही दुटप्पी भूमिका का घेता? असा सवालही साटम यांनी उपस्थित केलाय. खान ही मानसिकता आहे, पाकिस्तानी झेंडा लावणं, बॉम्बस्फोटमधील आरोपीसोबत प्रचार ही खान प्रवृत्तीची ओळख आहे. त्याचमुळे या मुंबईला खान महापौर नको ही आमची भूमिका आहे, असेही अमित साटम यांनी स्पष्ट केले. 

Continues below advertisement

मुंबईची वेगळी ओळख तयारी करू

धारावीमधील उद्योग धारावीमध्येच राहणार आहेत. त्याचबरोबर तिकडे एक हब बनवणार आहे, आणि त्या ठिकाणी सर्व व्यावसायिक लोक एकत्रित येतील. मुंबई महानगरपालिकेमध्ये जे 25 वर्षे महापौर राहिले त्यांचा रिमोट कंट्रोल वेगळीकडेच होता. स्टँडिंग कमिटींच काम देखील रिमोट कंट्रोलवर होतं. अधिकाऱ्यांच्या बदलीचे अजंडे देखील कोणीतरी द्यायचे, याचा रिमोट कंट्रोल बांद्रा ईस्टला आहे, असे म्हणत साटम यांनी पुन्हा ठाकरेंना लक्ष्य केलं. मुंबई महानगरपालिकेला वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, तसे मुंबई महानगरपालिकेमध्ये आर्ट अँड कल्चरल डिपार्टमेंट असलं पाहिजे. याप्रकारे आम्ही मुंबईची वेगळी ओळख तयार करू, हा मुद्दा आम्ही मॅनिफेस्टोमध्ये घेऊ. मुंबईमधल्या मोकळ्या जागेसंदर्भात आमची भूमिका आहे ती सर्व मोकळ्या जागा त्या महानगरपालिकेने सांभाळाव्या. पण,  प्रायव्हेट प्लेयर त्यामध्ये येऊ नये. 

साटम यांची आदित्य ठाकरेंवर टीका

जे स्वतःला पर्यावरणवादी समजतात त्यांनी एसटीपी प्लांट का केला नाही. महानगरपालिकेमध्ये एवढे पैसे आहेत, आंतरराष्ट्रीय शहर आहे तरीदेखील एसटीपी प्लांट नाही. रस्ते धुवून काढण्यासाठी त्यांनी बजेट द्यायला पाहिजे, मुंबईतली हवा चांगली आहे. बालबुद्धी असल्यामुळे अरे कार शेडला विरोध झाला, असे म्हणत आदित्य ठाकरेंवर अमित साटम यांनी बोचरी टीका केली. तसेच, काही लोकं स्वतःला युवा नेते म्हणून घेतात, पण या युवा नेत्यांनी युवांसाठी काहीच केलं नाही, असेही त्यांनी म्हटले.  

प्रायव्हेट स्कूलप्रमाणेच महापालिकेच्या शाळा करू

जशी ट्रीटमेंट आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मिळते तशी महानगर पालिकेमध्ये मिळायला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. जस इंटरनॅशनल स्कूलमध्ये फॅसिलिटी आहे तशी आम्ही BMC स्कूलमध्ये करू. आधी सिस्टीम तीच होती आणि आता देखील तीच आहे. पण, देवेंद्र फडणवीसांनी हे केलं आहे, करून दाखवलं आहे. मुंबईचा 60% ट्रॅफिक हा वेस्टन हायवेवर आहे. पण ज्यावेळेस वांद्रे टू वर्सोवा कोस्टल रोड होईल. त्याचबरोबर तो विरारपर्यंत जाईल तेंव्हा सगळ बरोबर होईल. वांद्रे टू वर्सोवा हा रोड 3 ते 4 वर्षात होईल. मोठ्या प्रमाणावर SRA चालू आहे, पण ह्याला 10 वर्षे लागतील. अजून 3 ते 4 वर्षात मुंबई मधील लोकल ही 1 रुपया न वाढवता AC होईल, असेही साटम यांनी सांगितले. 

हेही वाचा

एका पक्षप्रवेशासाठी मंत्री हेलिकॉप्टरने आले अन् गेले; गुवाहटी फेम शहाजी बापूची भाजपवर बोचरी टीका