मुंबई: ख्यातनाम व्यंगचित्रकार आणि ‘कॉमन मॅन’ म्हणून परिचीत असलेले आर के लक्ष्मण यांची आज 96 वी जयंती. आर के लक्ष्मण हे 'कॉमन मॅन'च्या माध्यमातून घराघरात पोहोचले. कॉमन मॅन, मालगुडी डेज, एशिनन पेंट्समधील गट्टू अशी अजरामर कार्टून्स आर के लक्ष्मण यांनी रेखाटली. लक्ष्मण यांचं ‘कॉमन मॅन’ हे कार्टून अनेक दशक चर्चेत राहिलं. ‘कॉमन मॅन’च्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध घडामोडींवर भाष्य केल्याने, जनतेनेही ते उचलून धरलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच आर के लक्ष्मण यांचा अभिमानाने उल्लेख करत. शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आपल्या भाषणात आर के लक्ष्मण यांचा उल्लेख करतात. आर के लक्ष्मण यांची कारकीर्द रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण (आर. के. लक्ष्मण) यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1921 रोजी झाला होता. ‘कॉमन मॅन’च्या माध्यमातून जगभरात त्यांची नोंद घेतली गेली. आर के लक्ष्मण यांची 1950 पासून सुरू केलेली कार्टून कला गेल्या काही वर्षांपर्यंत सुरुच होती. उतारवयातही त्यांनी प्रत्येक पीढीसोबत स्वत:ला कार्टूनच्या माध्यमातून जोडून ठेवलं. मात्र अखेरच्या काही दिवसात प्रकृती खालावल्यामुळे त्यांचा कुंचला शांत होता. अखेर 26 जानेवारी 2015 रोजी हा कुंचला कायमचा थांबला. टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात आर. के. लक्ष्मण यांचं ‘यू सेड इट’ या नावाने कार्टून प्रसिद्ध होत असे.  1951 मध्ये त्यांनी टाईम्स ऑफ इंडियात या व्यंगचित्र मालिकेला सुरुवात केली होती. स्थानिक वृत्तपत्रांमधून व्यंगचित्रकार म्हणून करिअरला सुरुवात केलेल्या आर. के. लक्ष्मण यांची नोंद जगभरातल अव्वल व्यंगचित्रकार म्हणून केली जाते. टाईम्स ऑफ इंडियासह द स्टँड, पंच, बायस्टँड, वाईड वर्ल्ड आणि टिट-बिट्समध्येही त्यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध झाले आहेत. जगप्रसिद्ध ब्रिटिश व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांचा त्यांच्यावर प्रभाव होता, असे ते नेहमी सांगत असत. आर के लक्ष्मण यांचा अल्पपरिचय 24 ऑक्टोबर 1921 रोजी म्हैसूरमध्ये जन्म मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे म्हैसूरच्या विद्यापीठातून बी. एची पदवी मुंबईच्या फ्री प्रेस जर्नलमध्ये पहिली पूर्णवेळ नोकरी, याठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचे सहकारी होते. तब्बल 50 वर्षे त्यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'मध्ये व्यंगचित्र रेखाटली. आर के लक्ष्मण यांनी चितारलेला 'कॉमन मॅन' सर्वांच्याच काळजाला भिडला. एशियन पेंटसाठी काढलेलं गट्टूचं रेखाचित्रही लोकप्रिय. अनेक कथा, कादंबऱ्या आणि प्रवासवर्णनांचं लेखन आर. के. लक्ष्मण यांनी 'मालगुडी डेज'साठी अनेक रेखाचित्र काढली. आर के लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून अनेक राजकीय घडामोडींवर अचूक भाष्य 1971 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित 1984 साली मॅगसेसे पुरस्काराने आर. के. लक्ष्मण यांचा गौरव 2005 साली पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला संबंधित बातम्या 'कॉमनमॅन'चा 'अनकॉमन'मॅन (फोटो फीचर) लवकरच ‘कॉमन मॅन’ची पुढची आवृत्ती