स्पेशल रिपोर्ट : नांदेड : वायफणा ते मुंबई... राधेश्याम मोपलवारांचा विस्मयकारक प्रवास!
मोपलवारांच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड, फॉरेन्सिक रिपोर्ट सादर : सूत्र
एबीपी माझा वेब टीम | 15 Nov 2017 07:42 PM (IST)
मोपलवार ऑडिओ क्लिपसंदर्भातील फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये सीडीच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या रिपोर्टमध्ये सीडी आणि त्यातील आवाजासोबत छेडछाडीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई : वरिष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट संबंधित समितीसमोर सादर करण्यात आला. या रिपोर्टमध्ये ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड केल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोपलवार ऑडिओ क्लिपसंदर्भातील फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये सीडीच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या रिपोर्टमध्ये सीडी आणि त्यातील आवाजासोबत छेडछाडीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. काय आहे नेमकं प्रकरण? सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेला समृद्धी महामार्ग प्रकल्प मोपलवारांच्या ऑडिओ क्लिपमुळे आणखी वादात अडकलं. या प्रकल्पाचे तत्कालीन प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे वादग्रस्त फोन संभाषणं समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले. ज्या समृद्धी महामार्गावरून सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये रण सुरु आहे, त्याच महामार्गाची त्यावेळी जबाबदारी असणाऱ्या मोपलवार यांच्यावर गंभीर आरोप झाले. धक्कादायक म्हणजे हे आरोप सेटलमेंटचे होते. शेतकऱ्यांच्या मते या ऑडिओ क्लिपमध्ये मोपलवार आणि एक मध्यस्थ यांच्यात एका इमारतीच्या बांधकामावरून सेटलमेंट सुरु आहे. ‘त्या’ ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे? या संभाषणात मोपलवार आहेत की नाहीत, याची पुष्टी आम्ही करत नाही. पण समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत होती.