मुंबईजवळच्या बुचर बेटावरच्या इंधनाच्या टाकीला आग
एबीपी माझा वेब टीम | 06 Oct 2017 09:17 PM (IST)
बई जवळच्या बुचर बेटाजवळील समुद्रातील तेलाचा साठा करणाऱ्या टाकीला आग लागल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
मुंबई : मुंबई जवळच्या बुचर बेटावरच्या समुद्रातील तेलाचा साठा करणाऱ्या टाकीला आग लागल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. जवाहर द्वीपावर ही दुर्घटना घडली आहे. सायंकाळी साडे चारच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळते आहे. ही आग मोठी असून गेल्या अनेक तासांपासून तिच्यावर नियंत्रण मिळवण्याचे सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही. तसेच आगीमध्ये नेमकं किती नुकसान झालं आहे याचंही माहिती मिळू शकलेली नाही.