मुंबई : अंगणवाडी सेविकांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अंगणवाडी कृती समितीने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.

अंगणवाडी सेविकांना आता सेवा ज्येष्ठतेप्रमाणे मानधन वाढवून मिळणार आहे. 1 ऑक्टोबरपासून मानधन वाढ लागू होईल. सध्याच्या मानधनावर 5 टक्के मानधन वाढ लागू होईल.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हे निर्णय झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

वाढीनंतर एकूण किती मानधन मिळणार?

अंगणवाडी सेविका :

0-10 वर्षे सेवा - 6500 रुपये

10-20 वर्षे सेवा - 6695 रुपये

20-30 वर्षे सेवा - 6760 रुपये

30 वर्षांहून अधिक वर्षे सेवा - 6825 रुपये

मिनी अंगणवाडी :

0 ते 10 वर्षे सेवा - 4500 रुपये

10 ते 20 वर्षे सेवा - 4635 रुपये

20 ते 30 वर्षे सेवा - 4680 रुपये

30 हून अधिक वर्षे सेवा – 4725 रुपये

मदतनीस :

0-10 वर्षे सेवा – 3500 रुपये

10-20 वर्षे सेवा – 3605 रुपये

20-30 वर्षे सेवा – 3540 रुपये

30 हून अधिक वर्षे सेवा - 3675 रुपये

दरम्यान, अंगणवाडी सेविकांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या नसून, सर्वच मागण्यांवर समाधानी नाही, असेही अंगणवाडी सेविकांच्या कृती समितीकडून सांगण्यात आले आहे. मात्र, सध्या सुरु असलेला संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.