मुंबई : मुस्लिम समाजातील तरुणांसाठी रोजगार आणि शैक्षणिक क्षेत्रातील 5 टक्के आरक्षण कायम करावे या मुख्य मागणीसाठी मुस्लिम समाजाकडून लाँग मार्च काढला जात आहे. भिवंडी ते आझाद मैदानापर्यंत हा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. मोर्चेकरी आज सकाळी भिवंडीहून निघाले असून मोर्चा ठाणे येथे पोहोचला आहे. मुस्लिम रिझर्व्हेशन फेडरेशन या संस्थेच्या नेतृत्वाखाली मालेगाव येथून हा लाँग मार्चचे काढला आहे.
या लाँग मार्चसाठी भिवंडी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. हा मोर्चा मुंबई-नाशिक महामार्गावरुन आझाद मैदानावर धडकणार आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने 5 टक्के आरक्षणाची मागणी यावेळी मांडली जाईल.
आरक्षणासह समाजाच्या इतरही मागण्या आहेत. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर विधानसभेत गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'एबीपी माझा'ने मोर्चात सहभागी झालेल्या आमदार आसिफ शेख यांच्याशी बातचीत केली. यावेळी त्यांनी सांगितले की, मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर लोकसभा निवडणुकीनंतर विशाल मोर्चा काढला जाईल. या मोर्चाला सरकार जबाबदार राहील.
मुस्लिम आरक्षणासाठी भिवंडी ते आझाद मैदान लाँग मार्च
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Feb 2019 12:42 PM (IST)
मुस्लिम समाजातील तरुणांसाठी रोजगार आणि शैक्षणिक क्षेत्रातील 5 टक्के आरक्षण कायम करावे या मुख्य मागणीसाठी मुस्लिम समाजाकडून लाँग मार्च काढला जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -