व्हायरल सत्य : महिलांचे केस कापणाऱ्या मांजरीमागील खरी कहाणी
परिया कुरेशी आणि महेक कुरेशी या नणंद-भावजयांच्या वेण्या एका विकृतानं कापल्या आणि ही बातमी संपूर्ण भिवंडीत वाऱ्यासारखी पसरली. या घटनेनं भिवंडीत अनेकांची झोप उडाली आहे. हा विकृत कोण आहे, महिलांच्या वेण्या कापण्यामागचं कारण काय, त्याचा उद्देश चोरी करण्याचा होता का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी शोधावी लागणार आहेत.
वेणी कापणारी चेटकीण समजून आग्य्रात वृद्धेची हत्या
दिल्लीजवळच्या काही गावांमध्ये अनेक महिलांसोबत असाच प्रकार घडला. चोरी किंवा विकृती या दोनच हेतूंनी अशा घटना होत असल्याचं दिसलं होतं. दिल्लीत मांजरीच्या रुपात आलेल्या तरुणी महिलांचे केस कापून नेत असल्याच्या अफवांचा बाजार पिकला. त्यामुळे याच अफवेचा फायदा उचलून भिवंडीतही असाच प्रकार घडल्याचा अंदाज आहे. त्यामुळे महिलांनी सतर्क राहून अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन करण्यात येत आहे.