Bhiwandi Building Collapse Live Updates | विजय वडेट्टीवार यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी
भिवंडीमध्ये तीन मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत दहा जणांचा मृ्त्यू झाला आहे . तर ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 22 Sep 2020 01:25 PM

पार्श्वभूमी
भिवंडी : भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला असून 25 जणांची सुखरुप सुटका करण्यात आलं. त्यांना उपचारांसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन...More
भिवंडी : भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला असून 25 जणांची सुखरुप सुटका करण्यात आलं. त्यांना उपचारांसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील TDRF तसंच NDRF चे जवान मदतकार्यात गुंतले आहेत. रविवारी (20 सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड इथली ही तीन मजली जीलानी इमारत पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून दुर्घटना घडली. रात्रीची वेळ असल्याने सर्व कुटुंबीय घरात झोपलेले असताना ही दुर्घटना घडल्याने, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 25 कुटुंबातील 70 ते 80 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.महत्त्वाची बाब म्हणजे मृतांमध्ये सर्वाधिक लहान मुलं आहेत.