आम्ही सगळे गाडगेबाबा यांच्या विचारावर काम करणारे आहोत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. मात्र, याचे उगम स्थान हे गाडगे बाबा असल्याचंही फडणवीस म्हणाले. गाडगेबाबा यांच्या विचारावर देशाचे सरकार चालत आहे. गाडगेबाबा यांच्या कर्मभूमीत जाऊन त्याचा करणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
आतापर्यंतचं हे सर्वात गोंधळलेलं सरकार : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
धोबी परीट समाजावर अन्याय झाला : फडणवीस
धोबी परीट समाजावर अन्याय झालेला असून अनुसूचित जातींमधून त्यांना वंचित ठेवण्यात आलंय. त्यासाठी 20 वर्षांपासून आंदोलन सुरू असल्याचे फडणवीस म्हणाले. बार्टीचा अहवाल चुकीच्या पद्धतीने तयार केला गेल्याचेही त्यांनी सांगितले. देशात अस्पृश्यता नसल्याचा निष्कर्ष काढला हा मूर्खपणा आहे. समाजाला अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट कारायचं नव्हत असं यावरुन वाटतं. आम्ही भांडे समितीचा अहवाल लागू करण्याचे प्रयत्न केले. मंत्रालयात अधिकारी, जुने मंत्री भांडे समितीचा अहवाल पुढे जाऊ नये असे प्रयत्न करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. आम्ही आमच्या सरकारमध्ये हे चालवून घेतले नाही, हा अहवाल आम्ही केंद्राला पाठवला आहे.
11 राज्यातून रजक समाजातील लोक कार्यक्रमात सहभागी -
देशातील जवळपास 11 राज्यातून रजक समाजातील लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याची मागणीही यावेळी यांनीही केली. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा, मध्यप्रदेश, पंजाब, हरयाणा, जम्मू-कश्मीर या राज्यातील रजक धोबी समाज अनेक वर्षांपासून आपल्या अधिकारांसाठी लढत असल्याचं दिनेश चौधरी यांनी सांगितले.
Devendra Fadnavis | महापुरुषांचा सातत्याने अपमान खपवून घेणार नाही, शिदोरी मासिकावर बंदी आणावी - देवेंद्र फडणवीस