Bhagat Singh Koshyari controversial statement : वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) पुन्हा एकदा चर्चेत आहेत. गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य  (Bhagat Singh Koshyari controversial statement)  करत त्यांनी वाद ओढावून घेतला. वक्तव्यानंतर पुन्हा एकदा कोश्यारी यांच्यावर सर्वच बाजूने टीका होत आहे. याबाबत फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे विरेन शाह यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 'मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात फक्त गुजराती आणि राजस्थानी लोकांचे योगदान नाही तर सर्व समाजाचं एकत्रित योगदान आहे.'  


विरेन शाह म्हणाले की, 'मुंबई आर्थिक राजधानीच्या योगदानाला समजात जातीत वाटणे चुकीचे ठरेल. मुंबईने सगळ्यांना व्यापार, उद्योगधंदा करायला जागा संधी दिली त्यामुळे हे साध्य होऊ शकलं. राज्यपालांनी जे वक्तव्य केले ती त्या राजस्थानी गुजराती संघटनेच्या पण पदाधिकाऱ्यांसमोर केले. मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात गुजराती-मारवाडी यांचे योगदान आहे, हे त्यांचे वक्तव्य खरं आहे. व्यापारामध्ये आमच्या गुजराती-मारवाडी कम्युनिटीचे अनेक लोक आहेत. पण हे फक्त योगदान गुजराती आणि मारवाड्याचे नाहीये तर मराठी, सिंधी मुस्लिम, पारशी या सगळ्यांचा मिळून योगदान आहे. '


आम्ही सर्व व्यापारी मुंबईत जन्म झालेलो आहोत, येथे आम्ही धंदा केलाय. आम्ही महाराष्ट्रीयन आहोत त्यामुळे अर्थात सगळ्यांचे मिळून योगदान आहे. समाजात जातीमध्ये या योगदानाला वाटू शकत नाहीत. मुंबईने सगळ्याला जागा दिली, व्यवसाय करू दिला म्हणून हे शक्य झाले, असेही विरेन शाह म्हणाले. 


दुकान मालक, कस्टमर, रिटेलर या सगळ्याचं यामध्ये योगदान असतं. आणि इतिहास सुद्धा बघितला सगळ्यांचे योगदान सगळ्यात समाजाने एकत्रित येऊन हे साध्य केले. मुंबई फक्त भारतातूनच नाही, तर परदेशातून सुद्धा लोक व्यापार करण्यासाठी येतात. छोट्यातल्या छोट्या माणूस इथे येऊन व्यापार करू शकतो, असे विरेन शाह म्हणाले.