मुंबई : मुंबईकरांना नव्या डबलडेकर बस मिळणार आहेत. बेस्टच्या ताफ्यात नव्या 100 डबल डेकर बेस्ट बस येणार आहेत.
बेस्टच्या ताब्यातील काही डबल डेकर बस चे आयुर्मान संपल्यामुळे आता नव्या 100 डबल डेकर बस खरेदी करण्यात येणार आहे. या करता बेस्ट प्रशासनानं टेंडर मागवले आहेत.काही कालावधीतच नव्या डबलडेकर बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील.


या बसची रचना जुन्या डबल डेकर प्रमाणे नसेल. नव्या डबल डेकर बसला मागे व पुढे असे दोन दरवाजे असतील ते बंद असणार आहेत. मागे व पुढे दोन जिने आहेत. बस मध्ये सीसी टीव्ही कॅमेरे असतील. या बसमध्ये 70 प्रवासी बसण्याची क्षमता असणार आहे. बस मध्ये इलेक्ट्रिक बोर्ड असेल त्यावर बस कुठून कुठे जाणार याची माहिती प्रदर्शित होईल. त्यामुळे प्रवाशांना अचूक थांब्याची अचूक माहिती मिळेल. डबल डेकर मधील खालच्या व वरच्या मजल्यावरील वाहकांना एकमेकांशी संपर्क साधायचा असेल तर ती साधनेही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


बेस्ट च्या ताब्यात असलेल्या बसेस चे आयुर्मान संपले की, त्या स्क्रॅप कराव्या लागतात त्यांच्या बदल्यात नवीन बस घ्याव्या लागतात. त्याच पद्धतीने या बस घेण्यात येत आहेत.


डबल डेकर बसही मुंबईची ओळख आहे. डबल डेकर बसमधून प्रवास करणे सगळ्यांच्याच आवडीचा भाग राहिला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या डबल डेकर बस मुंबईच्या रस्त्यावर धावत आहेत. मात्र देखभाल करण्याचा खर्च परवडत नसल्याने तसेच  नवीन मेट्रो मार्ग, उड्डाण पुलामुळे आता या डबल डेकर बस बेस्टमार्फत हळूहळू कमी केल्या जात आहेत.


संबंधित बातम्या :