मुंबई : ऐन पावसाळ्यात प्रशासनाने मुंबईतील धोकादायक असे 29 उड्डानपूल बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या विविध भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतल्या काही ठराविक गर्दीच्या ठिकाणी पाच किलोमीटरपर्यंत मुंबईकरांना मोफत बेस्ट सेवा पुरववली जाणार आहे. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत यासंबधीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर आजपासून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. किंग्स सर्कल येथील धोकादायक असे 2 पादचारी पूल बंद करण्यात आल्यामुळे या परिसरात खूप जास्त वाहतूक कोंडी होत आहे. तसेच प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे विनामुल्य बससेवेचा शुभारंभ येथूनच करण्यात आला आहे. बेस्ट प्रशासनाकडून आज किंग्स सर्कल रेल्वेस्थानक ते सायन रुग्णालय उड्डाणपूलादरम्यान विनामुल्य बससेवा पुरवली जात आहे. त्यामुळे पादचारी, प्रवाशांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडण्याची वेळ येणार नाही. अशीच विनामुल्य बससेवा इतरही भागात दिली जाणार आहे. येत्या काळात त्या-त्या भागात ही बससेवा सुरु करण्यात येणार आहे. VIDEO | गर्दीच्या ठिकाणी मुंबईकरांना बेस्टची मोफत सेवा, मुख्यमंत्र्यांच्या बेस्ट महाव्यवस्थापकांना सूचना | एबीपी माझा