मुंबई : बेस्टच्या कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी असून, कर्मचाऱ्यांना 5500 रूपये दिवाळी बोनस म्हणून जाहीर झाला आहे. एकूण 40 हजार कर्मचाऱ्यांना या दिवाळी बोनसचा लाभ होणार असल्याची माहिती महाव्यवस्थापकांनी बेस्ट समितीत दिली.


कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याच्या संदर्भात बेस्टचे महाव्यवस्थापक आणि पालिका आयुक्त यांच्यात वाटाघाटी सुरु होत्या. या वाटाघाटी नंतर अखेर आज बोनस जाहीर करण्यात आला. मागील काही महिन्यापासून बेस्टची आर्थिक स्थिती ढासळली होती. यामुळे बोनस मिळणार की नाही याबाबत संभ्रम होता. मागील वर्षी बोनस दिल्यानंतर पगारातून वळता करून घेण्यात आला होता.

याआधी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 15 हजार रूपये दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. यंदा 1  लाख  5 हजार बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार आहे. मागील वर्षी 14 हजार 500 रूपये बोनस दिला होता, यामध्ये यंदा 500 रूपयांची वाढ करण्यात आली आहे.

एकूणच या बोनसमुळे यावर्षी बेस्टच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड जाणार आहे.