Mumbai Police : अनेकदा पोलीस अधिकारी तसंच पोलीस विभागात (Mumbai Police) काम करणारे किंवा त्यांचे नातेवाईक आपल्या खाजगी वाहनांवर 'पोलीस' अशी लाल रंगाची पाटी लावून वाहन चालवत असल्याचं दिसून येतं. दरम्यान अशा प्रकारे 'पोलीस' पाटी लावून खाजगी वाहन चालवत असल्याबाबत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच अशा पाट्यांमुळे घातपाताची शक्यताही वाढत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे.
सर्व नागरीकांना समान कायदा या तत्वानुसार पोलीसांना देखील या कायदयाचे उल्लंघन करण्याचा अधिकार नसून असे करणे म्हणजे पोलिसांची प्रतिमा मलीन करण्यासारखे आहे. दरम्यान 'पोलीस पाटी लावलेली वाहने नाकाबंदी तसेच सुरक्षा तपासणी न होता सोडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलीस पाटीचा गैरउपयोग होऊन नागरिकांच्या जीवाला धोका होवू शकतो. तसेच अशाप्रकारच्या वाहनांमार्फत घातपात कृत्य होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
अन्यथा कारवाई होणार...
दरम्यान यामुळे सर्व प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी आणि अंमलदार यांना त्यांच्या खाजगी वाहनावर 'पोलीस' पाटी किंवा पोलीसांचे चिन्ह असलेले स्टिकर्स न टाकण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच यापुढे अशाप्रकारची पोलीस पाटी किंवा पोलीसांचे चिन्ह असलेले स्टिकर्स लावल्याचे आढळून आल्यास संबंधित पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल हेही सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा -
- Police Recruitment: पोलीस भरती कधी निघणार, फेसबुक लाईव्हवर तरुणांचा मुंबई पोलीस आयुक्तांना सवाल
- Mumbai Corona Update : मुंबईतील रुग्णसंख्येत मोठी घट, केवळ 27 नव्या रुग्णांची नोंद
- Mumbai Local Train : मुंबईत लोकल प्रवासासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस अनिवार्य
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha