बदलापुरात 25 वर्षीय प्रियकराकडून 30 वर्षीय इंजिनिअरची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 09 Mar 2017 11:38 AM (IST)
कल्याण : महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरची तिच्याच प्रियकराने गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे. कल्याणजवळच्या बदलापूर पश्चिम भागात घडलेल्या हत्याकांडाने खळबळ माजली आहे. 30 वर्षीय पूनम गजभिये ही सॉफ्टवेअर इंजिनिअर 25 वर्षीय विजय जारकर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. मात्र दोघांच्या कुटुंबीयांचा त्यांच्या नात्याला विरोध होता. यावरुन दोघांमध्ये अनेक वेळा वाद व्हायचे. मंगळवारी सात मार्चला संध्याकाळी याच विषयावरुन दोघांमध्ये पुन्हा भांडण झालं. त्यावेळी संतापाच्या भरात विजयने पूनमची गळा दाबून हत्या केली. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.