मुंबई :  अजित पवारांच्या (Ajit Pawar)  राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui )  यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. या घटनेमुळे मोठी   खळबळ माजली आहे.   लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन जणांना  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसऱ्या आरोपीची ओळख  पटल्याची माहिती समोर आली आहे.  काल रात्री ही घटना घडली असून झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख कथीच  पोस्टमध्ये केला आहे. 


बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यांच्या हत्येमागे नेमंक कोण? असा प्रश्न महाराष्ट्रासह समस्त देशाला पडला होता. एसआरएच्या प्रकल्पाशी कथित वादामुळे त्यांची हत्या झाली असावी असा दावा काही जण करत होते. मात्र आता लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. हिंदी भाषेत मजकूर टाकून बिश्नोई गँगने ही हत्या आम्ही केली आहे असं बाबा सिद्दिकी यांचं नाव घेऊन सांगितलं आहे.


काय म्हटले आहे सोशल मीडियावरील कथित पोस्टमध्ये?


देह आणि संपत्ती हे  माझ्यासाठी महत्त्वाचे नाही.  आजपर्यंत मी फक्त सत्कर्म केले, कायम  मैत्रीचे कर्तव्य मी पाळले.   सलमान खान आम्हाला हे सगळे नको होते, पण तुम्ही आमच्या भावाला त्रास दिला. आज जो बाबा सिद्दिकी सभ्य, मनमिळवू आणि स्वच्छ प्रतिमा असल्याचे दाखवत आहे तो एकेकाळी त्याच्यावर मोक्का लागला होता.  बाबा सिद्दिकीच्या हत्येचे कारण अनुज थापन आणि दाऊदचे बॉलीवूड, राजकारणी लोकांशी करत असलेले डिलींग हेच आहे..  आमची कोणाशीच वैयक्तिक वैर नाही पण जो कोणी सलमान खान आणि दाऊदची मदर करेल त्याला हिशोब आम्हाला ठेवावा लागेल. आमच्या कोणत्याही भावाला जर तुम्ही मारले तर आम्ही उत्तर देणारच, आम्ही कधीच पहिला वार केला नाही.  जय श्री राम #Lawrence Bishnoi Group #AnmolBishnoi #AnkitBhaduSherewala 


अभिनेता लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर का आला?


राजस्थानमध्ये 'हम साथ-साथ है' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 1998 च्या काळवीट हत्येप्रकरणी सलमान खानच्या कथित सहभागामुळे बिश्नोईने यापूर्वी धमकी दिली होती आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. बिश्नोई समाजाने काळवीट  पवित्र मानले आहे. म्हणून, लॉरेन्स बिश्नोईनेदावा केला की तो तेव्हापासून अभिनेत्यावर नाराज आहे.  कोणत्याही टोळीप्रमाणे, बिश्नोई देखील बातम्यांमध्ये राहण्यासाठी आणि उच्च-प्रोफाइल लोकांना लक्ष्य करतात.


हे ही वाचा :


नमस्कार केला, हातात हात घेतला, दु:खावेगाने व्याकूळ जिशान सिद्दिकींचे अजितदादांकडून सांत्वन