मुंबई : अजित पवारांच्या (Ajit Pawar)  राष्ट्रवादीचे नेते बाब सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय.  काल रात्री ही घटना घडली असून झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पोलिसांना पटल्याची सूत्रांची माहिती आहे.. ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींपैकी करनैल सिंह हरियाणाचा तर धर्मराज कश्यप उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती आहे. हे तिन्ही हल्लेखोर रिक्षानं घटनास्थळी आल्याची माहिती असून या प्रकरणात चौथा व्यक्ती या तिघांना मार्गदर्शन करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास बिश्नोई गँगप्रमाणेच एसआरए वादाच्याही अँगलने होणार असल्याची माहिती आहे..  एबीपी माझाच्या सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिलीय. 


बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणात तिसऱ्या आरोपीची ओळख पोलिसांना पटल्याची सूत्रांची माहिती आहे.   आरोपीनी बाबा सिद्धीकी यांचा हत्येपुर्वी बाबा सिद्धीकीवर पाळत ठेऊन हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.   रात्री उशिरपर्यंत आरोपींची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून  चौकशी सुरू होती. आरोपींची आजच वैद्यकीय चाचणी करून न्यायालयात  हजर केले जाणार आहे.  गुन्हे शाखेची पथकं फरार आरोपींचा शोध घेत आहेत.


गोळीबार करणारे आरोपी रिक्षाने घटनास्थळी 


करनैल सिंह हरियाणा, धर्मराज कश्यप उत्तर प्रदेश  अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी तिन्ही आरोपी हे रिक्षाने घटनास्थळी आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच तिन्ही आरोपी बाबा सिद्धिकी याची वाट पहात त्या ठिकाणी थांबले होते. मात्र या तीन आरोपीं व्यतिरिक्त अन्य एक आरोपी जो या तीन आरोपींना मार्गदर्शन करत असल्याचा पोलिसांना संशय आहे.   मागील अनेक दिवसापासून बाबा सिद्धीकी यांना फॉलो करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.   


गोळीबार होण्याअगोदर एक स्फोट 


बाबा सिद्दिकी हे झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसमधून बाहेर पडले. दोघेही घरी जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्याचवेळी झिशानला एक कॉल आला आणि ते दोघेही कारमधून बाहेर पडले. बाबा सिद्दिकी हे कार्यकर्त्यांसोबत बोलत होते. त्याचवेळी अचानक एक स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर प्रचंड धूर झाला. लोकांना वाटले की हा फटक्याचा धूर होता. मात्र तो फटाक्याचा धूर नव्हता. स्फोट झाल्यानंतर लगेचच तीन राऊंड फायर करण्यात आले. त्यानंतर लोक गाडीच्या दिशेने पळाले.   जीव वाचवण्यासाठी बाबा सिद्दिकी हे जीव वाचवण्यासाठी गाडीच्या दिशेने धावले.  मात्र पुन्हा दोन राऊंड फायर करण्यात आले.


हे ही वाचा :


देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली