'दहशतवादविरोधी पथकानं नालासोपारा येथून 20 बॉम्ब तसेच काही स्फोटके जप्त केली आहेत. तर वैभव राऊतसह सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या दोन ते तीन सदस्यांना अटक केली आहे. देशाच्या एकसंघतेच्या दृष्टीकोनाने ही एक गंभीर बाब आहे. देशात स्वातंत्र्य दिवस, ईद, गणपती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारची घटना घडण्यामागे षडयंत्र आहे’ असं अशोक चव्हाण म्हणाले. तसेच सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करत सरकार या विषयावर अजूनही गंभीर नसल्याचे बोलून दाखवले.
नालासोपाऱ्यात जप्त केलेल्या देशी बॉम्बप्रकरणी राज्यातील विविध भागांमधून 12 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे. ह्या सगळ्यांना मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, नालासोपारामधून ताब्यात घेतलं असून त्यांना चौकशीसाठी कोठडीत ठेवण्यात आलं आहे. प्रकरणात त्यांची भूमिका असल्याचं समोर आल्यास त्यांना अटक केली जाईल, असंही एटीएसने सांगितलं आहे.
नालासोपाऱ्याच्या भांडार आळीतल्या घरातून तब्बल 20 देशी बॉम्ब आणि 50 बॉम्ब बनवण्याचं सामान एटीएसच्या पथकाने हस्तगत केले होते. तसंच हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि शिवप्रतिष्ठानच्या सुधन्वा गोंधळकेरला एटीएसने अटक केली होती.
संबंधित बातम्या
नालासोपारा स्फोटकांप्रकरणी राज्यभरातून 12 जण एटीएसच्या ताब्यात
स्फोटकप्रकरणी आणखी दोघे अटकेत, ATS ची धडक कारवाई सुरुच
महाराष्ट्रातल्या घातपाताचा कट एटीएसने उधळला
'सनातन' साधकाच्या घरी स्फोटकांचा साठा, नालासोपाऱ्यात ATS ची धाड