मुंबई : बुलेट ट्रेन आणि मराठा आरक्षणावरुन आता शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 'सोंगाडे' संबोधलं आहे.

'ज्यांनी मराठा मूक मोर्चाचा अपमान केला, ते सोंगाडे आम्हाला विचारतात, घोंगड्याखाली काय? आठवा निवडणुकीत किती ठिकाणी तुमचे झाले खाली डोके वरती पाय' असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं.

https://twitter.com/ShelarAshish/status/909050261594816512

दुसऱ्या ट्वीटमध्ये 'जे मुंबईत रस्ते, नाल्यांच्या कामांचा दर्जा सांभाळू शकत नाही. नव्या कल्पनांचे "खड्डे" ज्यांच्याकडे. त्यांनी उगाच बुलेट ट्रेनची काळजी करु नये!' असा सल्लाही शेलारांनी दिला.

https://twitter.com/ShelarAshish/status/909050556232224768

एकीकडे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा शिलान्यास होतो, मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाचं घोंगडं भिजत आहे, अशा शब्दात 'सामना'तून सरकारवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन या टीकेला प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे येत्या काळात शिवसेना आणि भाजपमध्ये या मुद्द्यावरुन जुंपण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :


बुलेट ट्रेनच्या जंगी शोऐवजी मराठा समाजाच्या मोर्चांकडे लक्ष द्या : शिवसेना