आशिष शेलार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी
एबीपी माझा वेब टीम | 12 Jan 2017 06:45 PM (IST)
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायायलयाच्या आदेशानंतर शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसंच माजी कसोटीवर दिलीप वेंगसरकर यांनीही एमसीएच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. एमसीएच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आशिष शेलार यांची एकमतानं अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आशिष शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या जस्टिस लोढा समितीच्या शिफारशीनुसार एमसीएच्या आगामी निवडणुका घेणं आणि तोवर एमसीएचा कारभार चालवणं अशी आव्हानं आशिष शेलार यांच्यासमोर राहतील. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आशिष शेलार यांच्याकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे.