नवी मुंबई : नवी मुंबईतील सिडकोच्या 1100 घरांसाठी तब्बल 60 हजारांच्यावर अर्ज दाखल झाले आहेत. या घरांची लॉटरी 14 फेब्रुवारीला होणार आहे. सिडकोने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये 15 हजार घरांसाठी लॉटरीची जाहिरात काढली होती. त्या लॉटरीतून विविध कारणांनी 1100 घरं शिल्लक राहिली होती. योजनेकरिता अर्ज करण्याची मुदत 31 जानेवारीपर्यंत होती. आतापर्यंत सुमारे 60 हजार अर्ज प्राप्त होऊन 42 हजारहून अधिक अर्जांची पेमेंट स्वीकृती झाली आहे.
सिडकोने आपली 90 हजार घरांची लॉटरी घोषित केली असली तरी मागील लॉटरीमधील उरलेल्या 1100 घरांसाठीही लोकांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत सुमारे 60 हजार अर्ज प्राप्त होऊन 42 हजार हून अधिक अर्जांची पेमेंट स्वीकृती झाली आहे. सदर योजनेकरिता अर्ज करण्याची मुदत 31 जानेवारीपर्यंत होती.
या घरांची लॉटरी 14 फेब्रुवारीला निघणार आहे. त्याचप्रमाणे महागृहनिर्माण योजनेत 800 हून अधिक जणांना दोन-दोन घरे लागली होती. अशांना एक घर घेऊन दुसरे घर सिडकोला परत करण्याचे आवाहन केलं होते. ज्यांनी घर परत केली आहे त्यांची अनामत रक्कम 31 जानेवारी आणि एक फेब्रुवारीदरम्यान परत करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोकडून देण्यात आली आहे.
सिडकोच्या 1100 घरांसाठी तब्बल 60 हजारांवर अर्ज
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई
Updated at:
01 Feb 2019 08:27 AM (IST)
सिडकोने आपली 90 हजार घरांची लॉटरी घोषित केली असली तरी मागील लॉटरीमधील उरलेल्या 1100 घरांसाठीही लोकांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत सुमारे 60 हजार अर्ज प्राप्त होऊन 42 हजार हून अधिक अर्जांची पेमेंट स्वीकृती झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -